Softskill Test
संवाद कौशल्य
1) आपला संवाद आपले व्यक्तिमत्व प्रकट करतो.
2) जीवनात यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य अत्यावश्यक आहे.
3) संवाद म्हणजे दोन वा अधिक व्यक्तीं मधील विचार, माहिती, बातमी अथवा कल्पना ह्यांची देवाण घेवाण.
4) संवादाचे प्रकार – उदसीन, आक्रमक, आणि योग्य(प्रभावी) संवाद.
5) योग्य संवाद (प्रभावी) केव्हा होतो? तर – आपल्याला अपेक्षीत तो परिणाम साधण्या साठी , आपल्याला नेमके काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगता आलेच पाहीजे. त्याच बरोबर दुसर्याच्या मतांचा/ अपेक्षांचा आदर केलाच पाहीजे.
6) योग्य संवाद हा थेट, स्पष्ट, परंतु आदरपूर्वक करावा.
7) योग्य संवादासाठी भावनांवर नियंत्रण हवे. अहंकाराला मुरड घालावी लागते.
8) नीट, काळजीपूर्वक ऐकणे हा उत्तम संवादाचा पाया आहे.
9) आपण प्रत्युत्तर देण्यासाठीच ऐकतो. समजून घेण्यासाठी ऐकले पाहीजे.
10) सहानुभूती पूर्वक ऐकता आले पाहीजे. मनात प्रेम भावना असावी.
11) नम्रपणे व योग्य रीतीने “ नाही” म्हणता आले पाहीजे.
12) सामाजीक, सांस्कृतिक, भाषिक पार्श्वभूमी समजून संवाद साधावा.
13) पूर्वग्रह नसावा.
14) चूक कबूल करण्याचे धैर्य हवे.
वरील सर्व मुद्दे महत्वाचे आहेत. ते लक्षात ठेवून संवाद साधावा. म्हणजे योग्य व प्रभावी संवाद साधला जातो. अनावश्यक वाद विवाद टाळ्ले जातात. वेळ व मनस्ताप वाचतो. व आपले काम होते. लोक आपल्याकडे आदराने व कौतुकाने पहातात.
आपले व्यक्तिमत्व उजळून निघते, आपण सतत प्रगती पथावर रहातो.
लक्षात ठेवा योग्य संवाद हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
This is the link for Time management video in MARATHI
काम वेळेत पूर्ण करण्यासाठी…
वेळेचे व्यवस्थापन हे सरावाने शिकता येईल, असं कौशल्य आणि ज्ञानशाखा आहे. दैनंदिन सरावाने तुम्ही वेळेच्या व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट बनू शकता. दिवसाची सुरुवात करण्याआधी तुम्ही दररोज कामांची यादी तयार करा. तुमची तातडीची कामे महत्त्वाच्या कामांपासून वेगळी काढून प्राधान्यक्रमानुसार लावा. तुमचं सर्वात महत्त्वाचं काम निवडा आणि त्यानंतर ताबडतोब त्यावर काम करायला लागा. ते काम १०० टक्के पूर्ण होईपर्यंत एकाग्र होण्याची सवय लावा.
एखादे महत्त्वाचे काम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला आनंद, उत्साह आणि आत्मसन्मान उंचावल्याचा अनुभव येईल. तुम्हाला ऊर्जावान आणि शक्तिशाली वाटेल. आयुष्य अधिक नियंत्रणात आल्यासारखे वाटेल. तुम्हाला तुमचे पुढील काम सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
जेव्हा तुम्हाला तुमची गती कमी झाल्याचे जाणवेल किंवा चालढकल, उशीर करण्याची इच्छा होईल, तेव्हा स्वतःशी पुनःपुन्हा म्हणा, ‘हे आता करा! हे आताच करा! हे आताच करा!‘ काम तातडीने करण्याची जाणीव विकसित करा. कृती करण्याबाबत आग्रही असा. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम निवडण्याची, ते ताबडतोब सुरू करण्याची आणि ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने मागे लागण्याची शिस्त स्वतःला लावा.